एकीकडे देशात अनलॉक दोन सुरु झालंय. दुसरीकडे महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये मात्र लॉकडाउन पुन्हा करावा लागतो अशी स्थिती आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही ठिकाणी पुन्हा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. आणखी दहा दिवस पुणे आणि पिंपरीत लॉकडाउन असणार आहे अशी घोषणा पालकमंत्री अजित पवार यांनी केली आहे. दोन्ही शहरांमध्ये दहा दिवसांनी लॉकडाउन वाढवण्यात आला आहे.