लोणावळा शहर हे पर्यटकांसाठी दरवर्षी खुले असते. परंतु, यावर्षी करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांना लोणावळा परिसरातील भुशी धरणासह इतर पर्यटनस्थळावर येण्यास जिल्हाधिकारी यांनी मज्जाव करण्यात आलेला आहे. भुशी धरणावर दरवर्षी पर्यटकांची जत्रा भरल्यासारखी गर्दी पाहायला मिळते, परंतु यावर्षी मात्र उलट भुशी धरण परिसर हा निर्मनुष्य असल्याचे दिसत आहे. सध्या हा परिसर दाट धुक्यांमध्ये हरवल्याचे दिसत आहे.