करोनाचया वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील टाळेबंदी १३ जुलैच्या मध्यरात्रीपासून लागू करण्यात आली असून, २३ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत ती कायम राहणार आहे. लॉकडाउनच्या पहिल्या दिवशी अत्यंत शांततामय वातावरण, रस्ते, परिसर सामसूम, प्रत्येक चौकात पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहे.