मुंबई, ठाणे आणि कोकणात येत्या २४ तासांत बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची निरिक्षण आहेत. त्याचबरोबर याच काळात मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी परिसरात तीव्र मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उद्या या पावसाची तीव्रता थोडी कमी होईल पण मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढच्या २४ तासांत राज्यातील इतर भागांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणातल्या घाट भागात अतितीव्र ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मच्छिमारांसाठी धोक्याचे इशारा देतानाच किनारपट्टी भागात जोरदार वारे वाहण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.