पुण्यात करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर दहा दिवसांच्या लॉकडाउनला सुरूवात झाली आहे. मात्र तरी देखील काही नागरिक रस्त्यांवर विनाकारण येत असल्याचे दिसत आहे. अशांवर पोलीस कारवाई करत आहेत. मात्र आता त्यांचे प्रबोधन करण्यासाठी व त्यांना करोनाच्या धोक्याची जाणीव करून देण्यासाठी स्वारगेट चौकात प्रतिकात्मक यम रेडा घेऊन अवतरला होता.