आई होणं, मातृत्व उपभोगणं ही जगातील सर्वात सुंदर गोष्ट आहे, असं म्हटलं जातं. मात्र काही स्त्रियांना वैयक्तिक कारणांमुळे आई होण्यास अडचण निर्माण होते. परंतु, सध्याच्या घडीला वैद्यकीय क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या मदतीने स्त्रियांना कितीही समस्या असल्यातरीदेखील आई होण्याचा आनंद मिळू शकतो.