राजस्थानातील पेचप्रसंगात घोडाबाजारासंबंधी गुरुवारी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस आमदारामध्ये झालेल्या चर्चेच्या तीन ऑडिओ क्लिप समोर आल्या आहेत. या ऑडिओ क्लीप्स खऱ्या असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे. मात्र, एफआयआरमध्ये त्या व्हायरल क्लीप असल्याची नोंद आहे. त्यामुळे याप्रकरणी फोन टॅपिंग केले गेले का? असेल तर ही गंभीर बाब आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली आहे.