दिवसेंदिवस करोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच असल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या हद्दीत पुन्हा लॉकडाउन करावा लागला. या दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाउनच्या पाचव्या दिवशीही पिंपरी-चिंचवडकरांनी कडक लॉकडाउन पाळत चांगला प्रतिसाद दिला. शहरातील चौका-चौकात शांतता आणि मुख्य रस्त्यांवर सामसूम दिसून येत आहे. सर्वत्र निर्मनुष्य असे वातावारण आहे.