संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल लडाखचा दौरा केल्यानंतर आज जम्मू-काश्मीरमध्ये अमरनाथ मंदिराला भेट दिली. त्यानंतर त्यांनी कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळील फॉरवर्ड पोस्टला भेट दिली. तिथे तैनात असलेल्या जवानांसोबत संवाद साधला. कुठल्याही परिस्थितीत सीमेवर देशाचे संरक्षण करणाऱ्या या शूर सैनिकांचा आम्हाला खूप अभिमान आहे असे टि्वट राजनाथ सिंह यांनी केले.