पुणे शहरात दहा दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. सुरुवातीचे पाच दिवस कडक लॉकडाउन असणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र आज पाचव्या दिवशी सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तु खरेदीची दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सकाळपासून महात्मा फुले मंडईमध्ये भाजी खरेदी साठी नागरिकांची गर्दी झाली आहे. तसेच, आषाढाचा शेवटचा दिवस असल्याने अनेक मटण दुकानांबाहेर जवळपास अर्धा किलोमीटर पर्यंत नागरिकाच्या रांगा पाहण्यास मिळत आहे.