पिंपरी-चिंचवड शहरात पाच दिवसांपासून कडक लॉकडाउन सुरू आहे. मात्र, आजपासून नियमांमध्ये बदल करण्यात आला असून लॉकडाउनचे नियम शिथील करण्यात आले आहेत. दरम्यान, श्रावण महिना सुरू होण्याच्या अगोदर ‘गटारी’ साजरी करण्यासाठी पिंपरी-चिंचवडकरांनी सकाळ पासूनच चिकन आणि मटणाच्या दुकानांसमोर रांगा लावल्याचे दिसून आले. यावेळी नागरिकांनी केलेल्या गर्दीमुळे सोशल डिस्टंसिंगचा पुरता फज्जा उडाला.