कलाविश्वातील मानाच्या अशा बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अक्षय इंडीकर या मराठमोळ्या दिग्दर्शकाचा ‘स्थलपुराण’ हा चित्रपट झळकला होता. बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पोहोचण्यापर्यंतचा अक्षयचा हा प्रवास काही सोपा नव्हता. नुकतीच अक्षयने ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने त्या खडतर प्रवासा विषयी सांगितले आहे.