प्रत्येक भाजी मध्ये टाकता येण्यासारखा, लहान मुलांचा आवडता, भाजी असो किंवा चटपटीत पदार्थ आपल्या गुणधर्मामुळे सगळ्याच पदार्थांना रुचकर बनवणारा बटाटा आता सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलाय. गेल्या वर्षी कांद्याने डोळ्यांत पाणी आणले होते. यंदा त्याची जागा बटाटय़ाने घेतली आहे. उत्पादनातील घट आणि टाळेबंदीकाळात मागणीत झालेली वाढ यामुळे बटाटय़ाने दराचा उच्चांक नोंदवला.