करोनाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाला जाणार असल्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच त्यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे देशपातळीवर बराच खल झाला, त्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर आता राम मंदिर ट्रस्टमधील विश्वस्त असलेले आचार्य किशोरजी व्यास यांनी देखील पवार यांच्यावर टीका केली आहे. काही लोकांना मोदी आवडतच नाहीत त्यामुळं मोदीचं नाव घेताच त्यांच्या पोटात कसंतरी व्हायला लागतं, अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे.