पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल प्रत्यक्ष पाडायला मंगळवारपासून सुरुवात झाली. यामुळे औंध, बाणेर आदी भागांकडे जाणारी वाहतूक वळवण्यात आली आहे. या मार्गावर हिंजवडी ते शिवाजीनगर अशी मेट्रो लाईन प्रस्तावित असून यासाठी हा पूल अडथळा ठरत होता. त्याचबरोबर या पूलाची रचना चुकल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्याऐवजी त्यात भरचं पडली होती. त्यामुळे अखेर महापालिकेने हा पूल तोडण्यास परवानगी दिली. यानंतर इथं मेट्रोसाठी आणि वाहनांसाठी असा दुमजली पूल उभारला जाणार आहे.