इंदूर : येथील काही महिलांच्या गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासाठी खास स्वदेशी राख्या बनवल्या आहेत. त्याचबरोबर सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी देखील त्यांनी राख्यांची निर्मिती केली आहे. चीनी मालावर बहिष्कार टाकण्यासाठी ‘आत्मनिर्भर भारत’ या मोहिमेंतर्गत या राख्या बनवण्यात आल्याचे इंदूरचे खासदार शंकर ललवानी यांनी सांगितले.