पुण्यातील शांता पवार या ८५ वर्षीय महिलेचा लाठी-काठी खेळतानाचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमुळे त्यांचा प्रेरणादायी जीवनप्रवासही समोर आला आहे. या आजीबाई रस्त्यावर लाठी-काठीचा धाडसी कलाप्रकार सादर करतात. यातूनच ते आपली उपजीविका भागवतात. त्याचबरोबर यातूनच मिळणाऱ्या पैशातून त्या अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्चही उचलत आहेत. त्यांच्यामध्ये उत्कट सामाजिक जाणीवा असल्याचेही यानिमित्तानं समोर आलं आहे.