सफाईदारपणे लाठी-काठी चालवणाऱ्या व्हिडिओमुळे प्रकाशझोतात आलेल्या शांताबाई पवार या ८५ वर्षीय आजीबाईंची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुण्यात भेट घेतली. तसेच त्यांची हालाखीची परिस्थिती पाहता त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीनं एक लाख रुपये आणि साडी चोळी भेट देण्यात आली. भरोसा सेलच्या माध्यमातूनही या आजीबाईंना मदत करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी गृहमंत्र्यांनी दिली.