पूर्व लडाखमध्ये अजूनही तणावाची स्थिती कायम आहे. त्यामुळे उत्तरेकडील इंडियन एअर फोर्सच्या महत्त्वाच्या तळांवर मिग-२९के फायटर विमानांचा कसून सराव सुरू आहे. भारताने अमेरिकेकडून दीर्घ पल्ल्याची टेहळणी क्षमता असलेली पोसी़डॉन P-8I विमाने खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्याचबरोबर शस्त्रसज्ज प्रीडेटर-बी ड्रोन विमाने खरेदी करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचीही योजना आहे.