भारताचे लोकप्रिय दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना देशाचे ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखलं जायचं. २७ जुलै २०१५ रोजी आयआयएम- शिलॉंग येथे विद्यार्थ्यांसमोर व्याख्यान देत असताना कलाम यांचे निधन झाले. कलाम यांची भाषणे नेहमीच प्रेरणादायी असत. त्यांच्या भाषणातील अनेक विचार चांगलेच लोकप्रिय झाले होते.