ना कसले बंधन, ना कसली वचने, मैत्री म्हणजे खरंतर मनाने जवळ असणे नाही का ? सध्या करोनाच्या काळात एकमेकांच्या भेटीगाठी होणं अवघड झालंय. कॉलेज कट्टा, कट्ट्यावरचे मित्र, गरम गरम चहा, सोबतीला वडा पाव, खूप सार्या गप्पा, आणि मज्जा हे सगळं यंदा दिसेनासं झालंय. ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो, मात्र करोनाच्या काळात या दिवसा बद्ल तरुण वर्ग काय म्हणतोय ते पाहूया.