विरारमध्ये कावळ्यांच्या तावडीत अडकलेल्या जखमी ब्राउन बुबी सागरी पक्षाला प्राणीमित्राकडून जीवदान देण्यात आले. हा पक्षी दुर्मिळ असून अटलांटिक व पॅसिफिक महासागर किनाऱ्यावर आढळतो. प्राणीमित्र सुरज पांडे या तरुणाला हा पक्षी विरार पूर्वेच्या जीवदानी परिसरात कावळ्यांच्या तावडीत असताना आढळला होता. यानंतर या पक्षाची सुखरूप सुटका करण्यात आली. लवकरच त्याला नालासोपारा येथील रिसर्च सेंटरला पाठवण्यात येणार आहे.