लॉकडाउन काळात राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. सरकारने ऑलनाईन वर्ग घेण्याची परवानगी दिल्यानंतर अनेक शाळांमध्ये ई-शिक्षण सुरु झालंय. परंतू ग्रामीण भागात अनेक कष्टकरी वर्गातील लोकांकडे साधा मोबाईलही नाही. अशा लोकांच्या मुलांसाठी गावातील मंदिर आणि मशिदीच्या लाऊडस्पीकरवरुन पाढे आणि कवितांचं रेकॉर्डींग वाजवत लाऊडस्पीकरची शाळा सुरु करणाऱ्या होतकरु शिक्षकाची गोष्ट…