करोनाच्या काळातील लॉकडाउनमुळं राज्यात अनेक नागरिकांचे रोजगार गेले आहेत. त्यामुळे त्यांनी जगायचं कसं हा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक कामगार अजूनही बेरोजगार होण्याच्या वाटेवर आहेत. त्यामुळे राज्यातील एसटी सेवेसह स्थानिक सार्वजनिक वाहतूक आणि सर्व प्रकाराची दुकाने लवकरात लवकर सुरू करा, अन्यथा १० ऑगस्टनंतर आम्ही रस्त्यावर उतरु असा, इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्य शासनाला दिला आहे.