रिझर्व्ह बँकेच्या द्विमासिक पतधोरण आढाव्याबाबतची बैठक गुरुवारी संपली. करोनाच्या प्रादुर्भावामुळे २०२० च्या पहिल्या सहामाहीत जागतिक अर्थव्यवस्थेत मोठी घरसण झाली होती. देशाच्या अर्थव्यवस्थेत एप्रिल महिन्याच्या तुलनेत सुधारणा होत असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली.