‘चला हवा येऊ द्या’फेम विनोदवीर, अभिनेता भारत गणेशपुरे यांचा मोबाईल टकटक गँगने लंपास केला आहे. कांदिवलीतील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर रात्रीच्यावेळी प्रवास करताना ही घटना घडली आहे. या घटनेनंतर भारत गणेशपुरे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.