मंगळवारी रात्री झालेल्या या स्फोटानंतर बैरुतच्या रहिवाशांना बुधवारी सकाळी या भीषण विध्वंसाची दृश्ये नजरेला पडली. लेबनॉनची राजधानी बैरुतला हादरवणारा प्रचंड स्फोट अमोनियम नायट्रेटचा साठा पेटल्याने झाला असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले असून, या स्फोटांच्या चित्रफितींतूनही तसेच दिसून येत आहे. बैरुत मध्ये झालेल्या याच स्फोटाविषयी आपण बोलणार आहोत.