राज्यातील महा विकास आघाडी सरकारमध्ये योग्य समन्वय असून काँग्रेसच्या पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना पक्ष प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार चांगल्या प्रकारे काम करीत आहे. तसेच या सरकारमधील प्रत्येक मंत्री एकमेकांशी चर्चा करून निर्णय घेत आहे. या सरकारचे काम चांगले सुरू आहे. हे काहीना पाहवत नसून स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी अशा प्रकारची चर्चा आणि टीका केली आहे. तसेच ठाकरे कुटुंबास संपूर्ण महाराष्ट्र ओळखत आहे. त्या कुटुंबावर टीका केली जात असून आणखी ताकदीने या कुटुंबाच्या पाठीशी महाराष्ट्र उभा आहे.