आम्हाला सध्या राजकारणापेक्षा करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात अधिक रस आहे. त्यामुळे आम्ही अशी मागणी केली आहे की, राज्यात करोनाच्या चाचण्या वाढवल्या पाहिजेत. महाविकासघाडीत अंतर्गत कलह वाढलेला आहे. त्यामुळे सरकारमध्ये काय सुरू आहे, हे कुणाच्याच लक्षात येत नाही. सध्या बदल्यासंदर्भात जे काय सुरू आहे ते अनाकलनीय अशा स्वरुपाचं आहे. असं विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणीस म्हणाले.