करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आलं आहे. परंतु गरीब विद्यार्थ्यांना मोबाइल परवडत नसल्याचं आणि त्यांची शिक्षणाची गाडी थांबू नये यासाठी तामिळनाडूतील मदुराई येथील शिक्षकांनी आपल्याच वेतनातून विद्यार्थ्यांसाठी मोबाइल विकत घेऊन दिले.