राज्यातील मंदिरे आणि प्रार्थनास्थळ सुरू करण्याच्या मागणीसाठी पुण्यातील सारसबागेतील गणपती मंदिरा बाहेर भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली टाळ वाजून आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार माधुरी मिसाळ, महापौर मुरलीधर मोहोळ, नगरसेवक राजेश येनपुरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.