केंद्र सरकारने बुधवारी (२ सप्टेंबर २०२० रोजी) ११८ चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे. माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून ही बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये तरुणांमध्ये प्रचंड वेड असणाऱ्या पबजी गेमचाही समावेश आहे. मात्र भारतीय तरुणाईला वेड लावणारा हा गेम इतका लोकप्रिय का आहे याबद्दल अनेकांना माहिती नाही.