कामधंदा नसल्याने पोटापाण्यासाठी झटपट पैसे कमावण्याच्या हेतूने बहिण-भावाने युट्युबवर व्हिडिओ पाहून चक्क बनावट नोटा छापल्याचे समोर आले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये हा प्रकार घडला असून या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून शंभर रुपयांच्या ३४ बनावट नोटा, प्रिंटर, कागदी रिम असा एकूण ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.