पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नव्या कोऱ्या लाखो रुपयांच्या महागड्या बुलेट चोरून त्या फेसबुकच्या माध्यमातून उस्मानाबाद, धुळे, बीड आणि अहमदनगर येथे काही हजारांत विकणाऱ्या एका तरुणाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून १४ दुचाक्या जप्त करण्यात आल्या असून त्यात नव्या १० बुलेट आहेत.