पुण्याचे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांना बढती मिळाली असून बदली झाल्याने त्यांनी आज पुणेकरांचा निरोप घेतला. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पुणेकरांचे आभार मानले. तसेच पुणेकरांच्या स्वभावावर बोट ठेवत पुणेकरांनी मला ऱ्हस्व, दीर्घ शिकवलं, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. मागील दोन वर्षाच्या काळातील आपल्या कामगिरीचा आढावा यावेळी त्यांनी मांडला.