ठाणे जिल्ह्यातील भिंवडीमध्ये सोमवारी पहाटे तीन मजली इमारत कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली. पहाटे तीन ते चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या भयंकर घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला असून, २० जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. ढिगाऱ्याखाली दबलेल्यांचा शोध घेण्याचं काम वेगानं सुरू असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.