“ मी हा आरोप गेले अनेक वर्षे करतोय, मागील आठवड्यातही वारंवार केला आहे की, मराठा समाजातीलचं खूप मोठमोठ्या नेत्यांना मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असं वाटतं. त्यामुळे १५ वर्षे संपूर्ण बहुमाताचे सरकार असतानाही काँग्रेसने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही.” असा गंभीर आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. कोल्हापूरमध्ये येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.