मराठा समाजाच्या नेत्यांनी मराठा आरक्षणाचा विषय गुंतागुंतीचा करु नये, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. मराठा नेत्यांनी थोडा संयम बाळगावा, सुप्रीम कोर्टाच्या एका स्थगितीमुळं त्यांनी घाबरुन जाऊ नये. या विषयात गोंधळ वाढला तर होत्याचं नव्हतं होऊन बसण्याची वेळही येऊ शकते, असा सल्लाही त्यांनी दिला.