उद्धव ठाकरे सरकार हे अहंकारी सरकार असून आमच्या सूचनांची ते दखल घेत नाही. आमच्या सूचना जर सरकारने घेतल्या असत्या तरी खूप प्रश्न मार्गी लागले असते, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. राज्यातील करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येवर भाष्य करताना ते पुण्यात बोलत होते.