पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी रुग्णालयात काम करणारा वार्डबॉय आणि सुरक्षा रक्षक असलेल्या महिलेकडून कोविडवर परिणामकारक ठरणारे इंजेक्शन रेमडेसिवीर चढ्या दराने विकल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी निगडी पोलिसांत तक्रार अर्ज दाखल झाला असून यातून संबंधित व्यक्तींवर आणि रुग्णालयावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.