यावर्षी मावळ परिसरात समाधानकारक पाऊस झाला असून परिसरातील डोंगर हिरवेगार झाले आहेत. त्याचबरोबर धुक्यात हरवलेले डोंगर विविध फुलं, झाडांसह निसर्गाच विलोभनीय रूप ड्रोनच्या माध्यमातून चित्रित करण्यात आलं आहे. उंचावरुन केलेल्या या चित्रिकरणात अगदी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गही यात दिसून येत आहे. करोनामुळे पर्यटनास बंदी असल्याने यावर्षी पर्यटकांचा हिरमोड झाला असला तरी हे दृश्य त्यांच्यातील निराशा जरुर दूर करेल.