केंद्र शासनाने मंजूर केलेल्या कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. यातून खाजगी कंपन्यांचे आर्थिक हित साधले जाणार आहे. त्यामुळे या विधेयकाच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने उद्या शुक्रवारी राज्यभर विधेयकाची होळी करून निषेध व्यक्त केला जाणार आहे, अशी माहिती संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली.