वेळेच्या बाबतीत अत्यंत दक्ष असलेले उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या धक्कातंत्राचा अनुभव पुणे मेट्रोच्या अधिकाऱ्यांना आज आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटे पावणे सहा वाजता पुणे स्टेशन येथील मेट्रो कामाची पाहणी केली. गेल्या आठवड्यात त्यांनी पिंपरी चिंचवड येथे पहाटे सहाच्या सुमारास मेट्रो कामाची पाहणी केली होती.