केंद्र सरकारने कृषी विधेयक मंजूर केल्यानंतर त्याबाबत देशभरात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे आपल्या राज्याचा विचार करायचा झाल्यास, महाराष्ट्रात हे विधेयक मंजूर करणार नाही. मात्र त्यापूर्वी तज्ज्ञांशी चर्चा करणार असल्याची भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली. पुण्यात प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी कृषी विधेयकाबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी भूमिका मांडली