कडाक्याच्या थंडीची परवा न करता रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून देशाचं संरक्षण करणाऱ्या भारतीय जवानांसाठी रँचो अर्थात सोनम वांगचुक यांनी खास शोध लावला आहे. लडाख, गलवान आणि सियाचीन ग्लेशियर अशा कडाक्याच्या थंडीच्या प्रदेशात सेवा बजावणाऱ्या जवानांसाठी सोनम वांगचुक यांनी खास तंबू तयार केला आहे. बाहेर -14 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षाही कमी तापमान असले तरी तंबू असणाऱ्या जवानांना ते जाणवणारही नाही.