मानवी वसाहतीत बिबट्या आढळून येण्याच्या घटना अलिकडे सर्रास दिसत आहे. ही बाब लक्षात घेऊन आणि बिबट्या मानवी वस्तीकडे कसा प्रवास करत येतो, याचा अभ्यास करण्यासाठी मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जीपीएस टेलिमेट्रीकद्वार देखरेख ठेवली जाणार आहे. या प्रकल्पातून बिबट्या आणि माणूस यांच्या परस्परसंबंध समजून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.