३० ऑगस्ट २०२० रोजी स्पेशल फ्रंटियर फोर्सच्या जवानांनी पीपल्स लिबरेशन आर्मीला आश्चर्याचा धक्का देत आधीच कारवाई करून कैलास पर्वतरांग ताब्यात घेतली. चीनने ताब्यात घेतलेला पँगाँग लेकच्या उत्तरेच्या काठाचा भाग आपण परत घेतला. तसंच पूर्व स्पँगुर गॅप, माल्डो गॅरिसन हा पीपल्स लिबरेशन आर्मीने घेतलेला परिसर परत आपल्या ताब्यात आल्यामुळे या परिसरात पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित झाले. कैलास पर्वतरांग दक्षिण काठाच्या बाजूने सुरू होऊन उत्तर-पश्चिमेकडून ६० किलोमीटरवर दक्षिण-पूर्वेला जाते. पण भारत चीन सीमा वाद आणि कैलास पर्वत यांच्यातली जोडकडी काय आहे, आणि कैलास पर्वतरांगा महत्त्वाच्या का आहेत? हे आपण या व्हिडीओ मधून जाणून घेऊ.