करोनानं डोकं वर काढलेल्या पुण्यात प्रशासनानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उद्रेक झाल्यानंतर नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला असून, रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंतची संचारबंदी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. २८ फेब्रवारीपर्यंत हा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णय पुन्हा वाढवण्यात आला असून, पुणे शहारातील शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस १४ मार्चपर्यंत बंदच राहणार आहेत.