करोनाच्या लढाईत महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. करोना लढाईत केंद्राला अपयश आल्याचंही ते म्हणाले आहेत. तसंच ज्या राज्यांमध्ये भाजपाची सत्ता नाही तीच राज्यं करोना लढाईत अपयशी ठरली असल्याचं सांगत महाराष्ट्र, पंजाब, छत्तीसगडला औषधं न देणं हा अमानुषपणा असल्याचं सांगत त्यांनी संताप व्यक्त केला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.