कडक निर्बंध आणि वीकेंड लॉकडाऊनच्या काळातही बेजबाबदारपणाचं दर्शन घडवणाऱ्या नागरिकांविरुद्ध मनमाड पालिकेनं अनोखी मोहीम हाती घेतली आहे. विनाकारण फिरणाऱ्यांची रस्त्यावरच करोना चाचणी करून पॉझिटिव्ह असलेल्यांना रुग्णालयात पाठवलं जात आहे, तर निगेटिव्ह आलेल्यांना दंड आकारला जात आहे.